आमची यशोगाथा
ग्रामपंचायत भोकणी ता. सिन्नर, जि. नाशिक ठिकाणापासून ४९ की.मी. अंतरावर असून गावाची लोकसंख्या २१८१ असून गावाचे हद्दीत ४८० कुटुंब आहेत. भोकणी गावाला झाडांचे गांव म्हणून उभ्या महाराष्ट्रात ओळखल जाते. प्रगतीच्या अनेक पाऊल खूणा सोडत गगनाला गवसणी घालणारी प्रगती ह्या गावाने केली आहे. अनेक पर्यावरण पूरक व नाविन्यपूर्णक उपक्रम भोकणी गावात केलेले आहेत. खडकाळ व काटेरी गावाची ओळख पुसून हरित व समृद्ध गाव म्हणून आज नावारूपास आलेले आहे. आज रोजी हे गाव पर्यावरण पर्यटन केंद्र बनू पाहत आहे व अनेक प्रकारचे शासकीय अभ्यास दौरे व सहली येथे नियमित सुरु आहे.